सात महिन्यांपासून सर्व सभापतिपदे रिक्‍त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

वानाडोंगरी  (जि.नागपूर )  : हिंगणा नगरपंचायतमधील सर्व सभापतिपदे मागील सात महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे हिंगणा नगरपंचायतचा विकास ठप्प पडला आहे. नगरपंचायतच्या विकासासाठी निर्णय घेणाऱ्या सर्वच विषय समित्यांच्या सभापतिपदांची सात महिन्यांपासून निवडणूकच झाली नसल्यामुळे विकासाचे निर्णय कोण घेणार? त्यामुळे हिंगणा नगरपंचायतची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यासह जिल्ह्यात व हिंगणा नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. एवढेच नव्हेतर ज्यांच्या मार्गदर्शनाखली सर्वत्र विकासकामे सुरू आहेत ते आमदार समीर मेघेसुद्धा भाजपचेच आहेत. मग सभापतिपदांच्या निवडणुका सात महिन्यांपासून का घेतल्या गेल्या नाहीत?

वानाडोंगरी  (जि.नागपूर )  : हिंगणा नगरपंचायतमधील सर्व सभापतिपदे मागील सात महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे हिंगणा नगरपंचायतचा विकास ठप्प पडला आहे. नगरपंचायतच्या विकासासाठी निर्णय घेणाऱ्या सर्वच विषय समित्यांच्या सभापतिपदांची सात महिन्यांपासून निवडणूकच झाली नसल्यामुळे विकासाचे निर्णय कोण घेणार? त्यामुळे हिंगणा नगरपंचायतची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यासह जिल्ह्यात व हिंगणा नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. एवढेच नव्हेतर ज्यांच्या मार्गदर्शनाखली सर्वत्र विकासकामे सुरू आहेत ते आमदार समीर मेघेसुद्धा भाजपचेच आहेत. मग सभापतिपदांच्या निवडणुका सात महिन्यांपासून का घेतल्या गेल्या नाहीत? असा संतप्त सवाल गटनेते गुणवंता चामाटे यांनी केला. प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 29 डिसेंबर 2018 ला हिंगणा नगरपंचायत विषय समित्यांच्या सभापतिपदांची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे 9 जानेवारीला निवडणूक घेण्यासाठी नगरपंचायतची विशेष सभा बोलावण्यात आली होती. विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी बैठकीच्या दोन तास आधी मुख्याधिकारी, नगरपंचायत, हिंगणा यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे स्वतः दाखल करायची होती. परंतु विहीत कालावधीत एकाही नगरसेवकाने नामनिर्देशनपत्र सादर केले नाही. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत रद्द झाली होती. आज या कार्याला सात महिने झालेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते हे वारंवार निवडणूक घेण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत. कर्तव्यदक्ष आमदार समीर मेघे यांच्यासाठी हा आदेश काढणे सहज शक्‍य आहे. परंतु नगरपंचायतचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे भाजपचेच असल्यामुळे नगरपंचायतचे काम सुरू आहे. पण विकासाचा आत्मा असलेली स्थायी समितीसुद्धा रिक्तच आहे. नेमके समित्यांच्या निवडणुका का घेतल्या जात नाहीत, हे एक न उलगडणारे कोडेच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य, आरोग्य व स्वच्छता व महिला व बालकल्याण समित्यांचे सभापतिपदे हे रिक्तच आहेत.
निवडणूक का झाली नाही, याचा सविस्तर अहवाल पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेला आहे. पुन्हा निवडणूक घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला नगरपंचायत कार्यालयाने कळविले आहे. लवकरच हा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
डॉ. ऋचा धाबर्डे
मुख्याधिकारी
नगरपंचायत, हिंगणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All vacancies for seven months