भारिप व काँग्रेसमधील युती अडचणीत येणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

खामगाव : काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाची स्थानिक स्वराज्य संस्थेत असेलेली युती अडचणीत येण्याची शक्यता असून तसे झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीची समीकरणेच बदलणार आहेत. 

खामगाव मतदार संघात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाला शह देण्यासाठी मागील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाने युती केली. मात्र त्यांना यश आले नाही. सध्या खामगाव बाजार समितीत काँग्रेस व भारिपची सत्ता आहे. ही युती आगामी विधानसभेत कायम राहील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते. मात्र सध्या उभय पक्षात धुसफूस सुरु आहे. 

त्यामुळे युती अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खामगाव बाजार समितीमध्ये सभापतीपदी काँग्रेसचे संतोष टाले तर उपसभापती निलेश दीपके आहेत. गेल्या काही दिवसापासून युतीत आलबेल होते. मात्र नगरपालिकेतील पराभवानांतर दोन्ही पक्षात दुरावा वाढला. गत 1 मे ला काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस होता, तेव्हा भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक सोनोने यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, मात्र पूर्व कल्पना न दिल्याने सोनोने यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यावरून दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता.  दरम्यान आता 29 जून रोजी  भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या वाढदिवशी खामगाव बाजार समितीने विविध कार्यक्रम व जाहिरातीवर केलेला खर्च मंजूर करण्यास काँग्रेसने नकार दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बाजार समिती मधील काँग्रेस भारिपची युती  वांध्यात आली असून भारिप सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे. 

सोनोने व सानंदा मनोमिलन होईल काय? 

सततच्या अश्या प्रकारांनी भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे संबंध देखील ताणले जात आहेत. सोनोने मवाळ व सानंदा आक्रमक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे दोन्ही नेत्याचे मनोमिलन भविष्यात होईल काय हे सुद्धा सांगणे कठीण आहे. काँग्रेस आणि भारिपची युती खामगाव मध्ये तुटली तर आगामी विधानसभा निवडणुकीत खामगाव मतदार संघ व राज्यातही हे दोन पक्ष एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट आहे. 

Web Title: alliance between Bharip and Congress In trouble