गृहराज्यमंत्र्यावर हक्कभंगाची परवानगी द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नागपूर - महिलांवरील वाढते अत्याचार आणि बलात्काराबाबत शासनाने दिलेली माहिती आणि पुणे येथील पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. घटनांमध्ये वाढ झालेली असताना गृहराज्यमंत्री सभागृहात चुकीचे आकडे देत असल्याचा आरोप करून नारायण राणे यांनी त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात शुक्‍ला यांचा एक अहवाल सादर केला. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत अंदाजे 20 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. परंतु, राज्यमंत्री या घटनेत घट झाल्याची चुकीची माहिती सभागृहात देत आहेत. सभापती रामराजे निंबाळकर यांनी तपासणी करून शासनाचे आकड्यात सुधारणा करावी असे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले. आकड्यात सुधारणा न केल्यास नाइलाजास्तव हक्कभंगाची परवानगी द्यावी लागेल असे स्पष्ट केले. चर्चेत सहभागी झालेल्या संजय दत्त यांनी सरकारकडून गुन्ह्याची संख्या कमी होत असल्याचा मुद्दा खोडला. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांची नोंदणीच केली जात नसल्याचा आरोपही लावला. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यातील महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष, जलदगती न्यायालये, मदतीसाठी टोल फ्री क्रमांकासह विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील सर्व आयुक्तालये व जिल्ह्यात घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मुख्यालयाच्या ठिकाणी महिला साह्य कक्षाची स्थापना केली आहे. विनयभंग तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी महिला छेडछाड विरोधी पथक तयार केले आहे. महिला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषारोपपत्र 24 तासांच्या आत दाखल करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या चर्चेत जयंत पाटील, सतेज पाटील सहभागी झाले होते.

Web Title: Allow rights violations on the home minister