शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांची झाली पंचाईत; याचा झाला परिणाम

cortoon
cortoon

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 मुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. त्यापासून राजकीय क्षेत्रही सुटू शकले नाही. विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांनी सुरू केलेल्या तयारीला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ‘लॉक’ लागला आहे. आता सर्व पायाभरणी नव्याने करावी लागणार आहे.


अमरावती विभागीय पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक या वर्षी जून-जुलैमध्ये प्रस्तावित होती. त्यासाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम विभागीय आयुक्त यांच्या स्तरावरून सुरू झाले होते. आपल्या सोयीचे मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पदविधर शिक्षकांच्या भेटीगाठीवर इच्छुकांनी भर दिला होता. अकोल्यातही शिक्षक संघटनेच्या सदस्यांसाठी इच्छुकांनी मेळावे आयोजित केले होते.

या सर्व तयारीवर कोरोनाने पाणी फेरले आहे. राज्यात 15 फेब्रुवारीपासून शाळांना सुटी देण्यात आली आहे. 24 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही नियोजित वेळेत होण्याची शक्यता नाही. आता निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठी नव्याने तयारी केली जाईल. त्याचा कालावधी किती असेल हे सांगणे कठिण आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक विद्यमान शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह सर्वच इच्छुकांना मतदारांची नव्याने जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.


नव्या प्रश्नांना जावे लागणार सामोर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शिक्षकांपुढे अनेक प्रश्न निर्माण केले आहे. शाळा बंद होणे, वेतन वेळेत न मिळणे, शिक्षक अतिरिक्त ठरणे, पटसंख्या टिकविणे, कोरोना विषाणू नियंत्रणासाठी दारूच्या दुकानापासून ते बँकेच्या रांगेपर्यंत झालेल्या नियुक्त्या आदी अनेक नवे प्रश्न हाताळण्यासाठी शिक्षक आमदाराच नव्हे तर इच्छुकांपैकी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. जे इच्छुक स्वतः शिक्षकी पेशात आहेत, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे लावले रेटा याला अपवाद ठरला असला तरी आता शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. कदाचीत या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसल्यामुळे ते शिक्षक मतदारांपुढे तोंडघशी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com