अमरनगर-डिगडोह-बर्डी मार्गाने धावणार "आपली बस' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

हिंगणा एमआयडीसी, (जि.नागपूर) : ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल अमरनगर, नवीन निलडोह, डिगडोह, महिंद्रा कंपनीमार्गे बर्डी या मार्गाने लवकरच "आपली बस' सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने निलडोह, डिगडोहवासींनी आनंद व्यक्‍त केला. अनेक दिवसांपासून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे या मार्गावर आपली बस सुविधा सुरू करण्याची मागणी आमदार समीर मेघे यांच्याकडे करण्यात आली होती. सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेल्या निलडोह डिगडोह (देवी), अमरनगर हा परिसर हिंगणा मार्गापासून आतमध्ये आहे.

हिंगणा एमआयडीसी, (जि.नागपूर) : ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल अमरनगर, नवीन निलडोह, डिगडोह, महिंद्रा कंपनीमार्गे बर्डी या मार्गाने लवकरच "आपली बस' सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने निलडोह, डिगडोहवासींनी आनंद व्यक्‍त केला. अनेक दिवसांपासून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे या मार्गावर आपली बस सुविधा सुरू करण्याची मागणी आमदार समीर मेघे यांच्याकडे करण्यात आली होती. सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेल्या निलडोह डिगडोह (देवी), अमरनगर हा परिसर हिंगणा मार्गापासून आतमध्ये आहे. त्यामुळे तेथून शहरात जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना बस मिळण्यासाठी दीड-दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागत होते. आमदार मेघे यांनी संबंधित अधिकारी व मनपाच्या परिवहन सभापतींना पत्र दिले. दरम्यान, मंगळवारी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन सभापती बंटी कुकडे यांची भेट घेतली. त्यांनी लवकरात लवकर येत्या 10 दिवसांत बस सुविधा सुरू हाईल, असे आश्‍वासन भाजयुमोचे महामंत्री कमलेश खोब्रागडे व पदाधिकाऱ्यांना दिले. या वेळी विजय गंथाडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष महेश लोखंडे, सौरभ झा, प्रवीश भाबडा, कमलेश खोब्रागडे, ओमप्रकाश वैद्य, तपन ढाली उपस्थित होते. 
अमरनगर, निलडोह, डिगडोह येथील नागरिक बससुविधेपासून वंचित होते. या तिन्ही गावांतील नागरिकांना बससाठी दोन किलोमीटर दूर हिंगणा रोडवर यावे लागायचे. अनेक संघटनांची ही मागणी होती. आमदार समीर मेघे यांनी लक्ष दिल्याने आता हा प्रश्‍न निकाली निघणार. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
-प्रदीप ठाकरे 
जिल्हा संघटक, शिवसेना 

 एमआयडीसी परिसर मजूर, कामगारांचा परिसर आहे. पण, लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे या परिसरात अनेक समस्या आहेत. एसटी गावात येत नव्हती. अनेक दिवसांपासून आमची संघटना पाठपुरावा करते. "सकाळ' आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविते. आता "आपली बस' सुरू होणार आहे.
-बाबूराव येरणे 
औद्योगिक कामगार विकास संघटना 
कार्याध्यक्ष, हिंगणा एमआयडीसी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amarnagar-Digdoh-Birdie trains "your bus"