आंबेडकरांनी संविधानासाठी सोबत यावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

नागपूर : ऍड. प्रकाश आंबेडकरांना भाजपची "बी' टीम म्हणता येणार नाही. तसा पुरावाही नाही. पण, सी, डी, इ असे काहीतरी आहे. त्यांची सध्याची भूमिका भाजपच्या फायद्याची आहे. संविधान बचावासाठी तरी आमच्यासोबत आघाडी केली पाहिजे, असे नमूद करीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण दिले. बैठक झाल्यास जागांसंदर्भात बोलता येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

सिव्हिल लाइन्स येथील प्रेस क्‍लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीला 25 जागा देण्यास अनुकूल आहे. मात्र, वंचितने कॉंग्रेसला 40 जागा मागितल्या. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीपेक्षा कॉंग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. वंचितला 7 टक्के तर कॉंग्रेसला 16 टक्के मते आहेत. ऍड. आंबेडकर आघाडीबाबत गंभीर नाहीत. त्यांची भूमिका भाजपला फायदा पोहोचविणारी आहे. आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार, त्यासाठी त्यांच्याशी बोलायची तयारी आहे. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असे ते म्हणाले. भाजप द्वेष आणि भीतीचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्वीकारली. पण, ही जबाबदारी सर्वांची असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनात मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढले, परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्वांना "क्‍लीन चिट' देण्याचा सपाटा लावला. साडेचार वर्षांत पदभरती केली नाही. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. मेगा भरतीला आता राज्यपालांनी मान्यता दिली. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत याची प्रक्रिया सुरू होणार नसल्याचे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambedkar should come along with For the Constitution