रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले अन...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

घटनास्थळी पोहोचलेल्या एसटी नियंत्रक इम्रान पठाण यांनी मदतकार्य सुरू केले. त्याच्या प्रयत्नांना जखमींना कोंढाळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत वृषभ हा किरकोळ जखमी झाला.

कोंढाळी, (जि. नागपूर) : उपचारानंतर घरी परत जाताना भरधाव रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन वीस फुट खड्ड्यात जाऊन कोसळली. ही घटना नागपूर अमरावती मार्गावरील खापरी नजीक दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झालेत. 

आकोट नजीकच्या हिवरखेड येथील लक्ष्मण किसन कट्यारमल (वय 40) हा नागपूर येथे काम करीत असताना चार दिवसांपूर्वी पडून जखमी झाला होता. यात त्याचा एक पाय फ्रॅक्‍चर झाला. लक्ष्मणवर नागपूरच्या शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार झाले. शनिवारी सकाळी त्याला उपचारानंतर विश्रांतीसाठी सुटी देण्यात आली. त्याला त्याच्या मूळ गावी रुग्णवाहिकेने परत पाठविण्यात आले. आकोटकडे जाताना अमरावती मार्गावरील खापरी बारोकर येथे रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या "माईलस्टोन'ला धडक दिली. यानंतर ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वीस फुट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात येवढा जबरस्त होता की यात रुग्णावहिका संपूर्णपणे पलटी झाली. 

चालकासह चौघे गंभीर
यावेळी रुग्णवाहिकेत लक्ष्मणचे वडील किसन कट्यारमल (वय 66), आई मनकर्णा (वय 60), मुलगा वृषभ (वय 9, सर्व रा. हिवरखेड तालुका आकोट जिल्हा अकोला ) व त्याच्यासोबत काम करणारा मित्र सूरज कवडू कांबळे (वय 25, रा. सिल्ली जि. वर्धा) असे पाच जण त्यात होते. रुग्णवाहिका चालक जितेद्र कुमार उईके (वय 21, रा. सिवनी म.प्र.) हे जखमी झाले. या अपघाता नंतर लगेच घटनास्थळी पोहोचलेल्या एसटी नियंत्रक इम्रान पठाण यांनी मदतकार्य सुरू केले. त्याच्या प्रयत्नांना जखमींना कोंढाळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत वृषभ हा किरकोळ जखमी झाला. तर चालकासह चौघे गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूर शासकीय वैद्यकिय रुग्णालयात दाखल केले आहे. कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

कोंढाळीच्या डॉक्‍टरांचा अजब सवाल 
गंभीर जखमी किसन, सूरज, व वृषभ यांना तर मनकर्णा, लक्ष्मण व चालक जितेद्र यांना ओरियंटल कंपनीच्या रुग्णवाहिकेने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केद्रात आणले. अपघाताची माहिती स्थानिकांना मिळाल्याने ते तयारीतच होते. कोंढाळी केंद्रात मात्र येथे जखमींना आणल्यावर नव्याने रुजू झालेल वैद्यकिय अधिकारी डॉ. नितिन कान्होलर यांनी येथे मदत करणाऱ्यांना येथे जखमींना का आनले सरळ नागपूरला नेले नाही?, असा सवाल केला. डॉक्‍टरांना तातडीने उपचार करण्यांची विनंती केली त्यानंतर उपचार सुरू झालेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance accident on Amravati road