रुग्णवाहिका चालकांचे उपोषण आजपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भंडारा : शासकीय रुग्णवाहिका चालक संघटनेद्वारे उद्या, मंगळवारपासून किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

भंडारा : शासकीय रुग्णवाहिका चालक संघटनेद्वारे उद्या, मंगळवारपासून किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती भोपाळ येथील मे. अशकॉम कंपनीच्या मार्फत केलेली आहे. या चालकांना किमान वेतन मिळत नसून, साप्ताहिक सुटी, शासकीय सुट्यांचा लाभ मिळत नाही. हे चालक गेल्या 10 ते 15 वर्षांपासून आरोग्य विभागात सेवा देत असले तरी, त्यांना कोणताही शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही. आता जुलै महिन्यात कंत्राटदार कंपनीने शासनाच्या परिपत्रकानुसार किमान वेतनही दिले नाही.
याच्या विरोधात सर्व रुग्णवाहिका चालक उद्या, मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. याचा आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance drivers fast from today