रुग्णवाहिकेची ट्रकला धडक; एक ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

साकोली - रुग्णवाहिकेने ट्रकला मागून दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर पंचायत समितीसमोर घडलेल्या या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. २९) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. चेतेस टोलीराम बघेले (वय २५, रा. कमरगाव, जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. 

जांभळी येथील राजकुमार मारोती ठाकरे (वय ४५) हा रुग्णवाहिकेचा (एम. पी. ५०/डी. ए.०१९५) चालक असून, तो गोंदिया येथून जांभळी येथे चेतेससोबत येत होता. रात्री १ वाजताच्या सुमारास येथील पंचायत समितीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेची नागपूरकडे जात असलेल्या ट्रकला (एम. एच. २४/जे. ८५५५) मागून धडक बसली. यात रुग्णवाहिकेच्या समोरील भाग चेंदामेंदा झाला. अपघातात जखमी चेतेसला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर, चालक राजकुमार ठाकरे याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू गेनीराम मेश्राम, रा. जांभळी यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

Web Title: ambulance & truck accident