रुग्णवाहिकेला पिकअपव्हॅनने उडविले

file photo
file photo

अमरावती : चांदूररेल्वे मार्गावरील वाघामाय मंदिराजवळच्या वळणरस्त्यावर रुग्णवाहिकेला मालवाहू पिकअप व्हॅनने धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील गर्भवती महिलेसह पाचजण जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविता अविनाश कडू (रा. सोनगाव, चांदूररेल्वे), वनिता खडसे, सुजाता पाटील, प्रांजली नितीन पाटील, नितीन चोकोबा पाटील व महेश गजानन जवंजाळ अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. जवंजाळ हे रुग्णवाहिकेचे चालक आहेत. एका गर्भवती महिलेला घेऊन ही मंडळी गावातील आशा व नातेवाइकांसह चांदूररेल्वे येथून जिल्हा स्त्री रुग्णालयात येत होते. वाघामाय मंदिराजवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने रुग्णवाहिकेला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामुळे खासगी वाहनात बसवून जखमींना इर्विनमध्ये हलविले. सुदैवाने गर्भवती महिला किरकोळ जखमी झाली. तिलाही डफरीनमध्ये दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com