सर्वसामान्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

वणी (जि. यवतमाळ) : केंद्र असो वा राज्य सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते प्राप्त करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून शेवटच्या माणसाचा विकास करायचा आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात काम सुरू आहे. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भाजप-शिवसेना मित्र पक्ष महायुतीच्या सर्वच उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

येथील शासकीय मैदानावर शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे राज्य सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर, वरोरा मतदारसंघातील उमेदवार संजय देवतळे, शिवसेनेचे गणपत लेंडागे, राजू तुराणकार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेंडे, रवी बेलूरकर, लिशा विधाते, गजानन विधाते आणि अन्य उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, आपल्या देशात दिवाळीचा आनंद उत्सव येत आहे. त्याआधी 24 ऑक्‍टोबरला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात निकालानंतर दिवाळी साजरी होणार आहे. मोदी सरकारने 50 कोटी गरिबांसाठी आयुष्यमान भारत योजना आणून गरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली. गरिबांना मोफत गॅस देऊन 13 कोटी गरीब महिलांना त्रासापासून मुक्त केले. दहा कोटी स्वच्छतागृहे बांधून स्वच्छ पर्यावरणाचा ध्यास घेतला. 370 कलम हटवून देश सुरक्षित केला. हे सरकार आतंकवाद्यांचे कर्दनकाळ झाले आहे. महाराष्ट्रातसुद्धा भ्रष्टाचारमुक्त शासन देऊन महाराष्ट्रात एक नवीन संस्कृती निर्माण केली. या परिसरातही भाजप आमदाराने 677 कोटींची विकासकामे करून एक नवीन कीर्तिमान निर्माण केला आहे.
त्यांच्या भाषणापूर्वी हंसराज अहीर यांनीही जनसमुदायाला मार्गदर्शन करीत या शासनाने शेतकरी, शेतमजूर व या भागातील प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amit shah campaign in wani