शहांच्या सभेसाठी आमदारांना गर्दीचे ‘टार्गेट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

नागपूर - येत्या २० जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची नागपुरातील पहिली जाहीर सभा यशस्वी व्हावी, यासाठी भाजपचे नेते झटत असून, विदर्भातील भाजप आमदारांना गर्दी जमविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. 

येत्या १९ व २० जानेवारीला नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीच्या समारोपाला भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अमित शहा यांची जाहीर सभा आहे. नागपुरातील सर्वांत मोठे मैदान असलेल्या कस्तुरचंद पार्कवर ही सभा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांची नागपुरातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. या सभेला किमान एक लाखावर लोक जमा झाले पाहिजे, अशी भाजपच्या वरिष्ठांची इच्छा आहे.

Web Title: Amit shah meeting crowd target to MLA