"शहेनशहा आमच्या गावात येऊन गेला' 

Amitabh bacchan
Amitabh bacchan

रामटेक : रामटेक तालुक्‍यातील रमजान घोटी येथील ग्रामस्थांसाठी एक वेगळाच आनंद घेऊन आली. स्वप्नातही अमिताभ बच्चन आपल्या छोट्‌याशा गावात येतील असे वाटणेही शक्‍य नव्हते त्या गावात सकाळी सकाळी शहेनशहा प्रगटला. गावर्कयांचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाचे चित्रिकरण रमजान घोटी या गावात करण्यात येत होते. 

भारतीय सिनेसृष्टीचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या "झुंड" सिनेमाचे चित्रिकरण तालुक्‍यातील रमजान घोटी या छोट्‌याशा गावात करण्यात आले. त्यावेळी शहेनशहाने सरळ खाटेवरच "ताणुन" दिली. त्यावेळी त्यांच्या चेऱ्यावर समाधानाचे भाव होते. अमिताभ बच्चन बैलगाडीत बसले. खाटेवर झोपले. अशा प्रकारचे चित्रिकरण होते तर एका दृष्यात ते एसटी बसमध्ये बसून प्रवास करतात असे दृष्य होते. त्यासाठी रामटेक आगारातून भाडेतत्वावर निळी बस घेण्यात आली होती. आर्ची अर्थात रिंकू राजगुरू तर एका सामान्य मुली प्रमाणेच वागत होती. गावातील काही मान्यवरांसोबत चहा प्याल्यानंतर गावातील लोकांनी चहाचे कप फेकुन दिले. त्यावेळी रिंकूने ते कप उचलुन कचऱ्याच्या टोपलीत टाकले. आणि आम्ही आलो तेव्हा इतकी स्वच्छता असुन आम्ही कचरा करणे योग्य नाही असा संदेश दिला. दुपारी साडेतीन वाजता बसच्या प्रवासाचे चित्रिकरण करण्यात आले.

चित्रिकरणादरम्यान अमिताभ गावातील लोकांना हात हलवून अभिवादन करीत होता. काही वेळा आपल्या गाडीजवळ उभा राहीला त्यावेळी गावर्कयांना त्याच्यातील साधेपणा दिसून आला. ती सर्व दृष्ये डोळ्यात साठवुन गावकरी आता अभिमानाने सांगतील की, शहेनशहा आमच्या गावात येऊन गेला. जि.प.सदस्या शांता कुमरे यांनीही या चित्रपटात छोटीशी भूमिका केली आहे. चित्रिकरण पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com