महानायकाने केला 'शिवशाही'ने प्रवास

नागपूर - ‘शिवशाही’तून प्रवास करताना ट्रॅकसूट घातलेले अमिताभ बच्चन.
नागपूर - ‘शिवशाही’तून प्रवास करताना ट्रॅकसूट घातलेले अमिताभ बच्चन.

नागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी महाविद्यालयीन जीवनात तसेच सुरुवातीच्या संघर्षकाळात बस व ट्रामने प्रवास केल्याचे अनेकांनी ऐकले आणि वाचलेही. त्यांनी ते अविस्मरणीय अनुभव चाहत्यांसोबत बऱ्याचदा "शेअर'ही केले. परंतु, "सेलीब्रिटी' झाल्यानंतर बिग बी यांनी बसने आणि तोही नागपूरच्या रस्त्यावर प्रवास केल्याचे ऐकल्यानंतर नक्‍कीच त्यांच्या चाहत्यांना नवल वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे. बिग बी यांनी रविवारी चक्‍क "शिवशाही'तून शहरात फेरफटका मारून अनेकांना सुखद धक्‍का दिला. या प्रवासातील अनुभवाची छायाचित्रे स्वत: बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर टाकले.

"झुंड' चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सध्या बिग बी यांचा नागपुरात मुक्‍काम आहे. तीन डिसेंबरला शहरात आगमन झाल्यापासून ते शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. मधल्या काळात शूटिंगपासून थोडा ब्रेक घेत ते अंबानींच्या मुलीचे लग्न व "न्यू इअर'साठी मुंबईला जाऊन आले. यादरम्यान त्यांनी मोहननगरातील सेंट जॉन्स हायस्कूल, काटोलजवळील कोंढाळी आणि कोराडी मार्गावरील पांजरा या गावात शूटिंग केले. इतरही लोकेशन्समध्ये त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या मुक्‍कामादरम्यान त्यांच्या चाहत्यांना बिग बी यांच्या स्वभावाचे अनेक पैलू जवळून पाहायला व अनुभवायला मिळाले. कधी त्यांनी महाराजबागच्या रस्त्यावरून बाइकची रपेट मारली, तर कधी ते शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले. कधी देशाचे हृदयस्थान मानल्या जाणाऱ्या झिरो माइल्सचे छायाचित्र ब्लॉगवर "शेअर' केले. तर, कधी नागपूरच्या कडाक्‍याच्या थंडीचे वर्णन केले.

रविवारी तर त्यांनी चक्‍क "शिवशाही'तून प्रवास करून नागपूरच्या "नाइट लाइफ'चा "फिल' अनुभवला. एवढ्या मोठ्या "सेलिब्रिटी'ला साध्या बसमधून प्रवास करताना पाहून अनेकांना नवल वाटले. स्वत: बिग बी यांच्यासाठी हा क्षण कधीही न विसरता येणारा होता. बच्चन यांनी प्रवासाचे फोटो उशिरा रात्री आपल्या अधिकृत ब्लॉगवर टाकले. आपल्या भावना व्यक्‍त करताना अमिताभ म्हणाले, कॉलेजमध्ये शिकत असताना मी दररोज बसने ये-जा करायचो. त्यानंतर सत्तरच्या दशकात कोलकाता येथेही अनेकवेळा ट्रामने प्रवास केला. सातासमुद्रापार बर्मिंगहॅम (लंडन) मध्येदेखील "बस राइड' केल्याचे त्यांनी लिहिले. भूतकाळातील ते अविस्मरणीय अनुभव मनाला खूप आनंद देणारे होते. त्यांचे शब्दांत वर्णन करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com