ती रक्कम नागपूर मधील एटीएम चोरीच्या घटनेतील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खामगाव : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून स्कॉर्पिओ गाडीने मुंबईकडे जाणार्‍या हरीयाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी आज सकाळी 10 वाजेदरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून नांदुरा रोडवरील चिखली-आमसरीनजीक जेरबंद केले आहे. सदर चोरट्यांकडून 53 लाख रुपयांची रक्कम, देशी कट्टा, गॅस कटर,स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर टोळीत एका महिलेसह आणखी दोघांचा समावेश असून दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या टोळीकडून मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

शिवाजीनगर पोस्टेचे वाहतुक शाखेचे कर्मचारी पोकॉ. दिनकर राठोड, रफिक शहा, भगवान वानखडे हे तिघे नागपूर - मुंबई मार्गावरील गंगा ढाब्याजवळ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना अकोलाकडून खामगावकडे दिल्ली पासिंगची स्कॉर्पिओ सुसाट येतांना दिसून आली. यावेळी वाहतुक कर्मचार्‍यांनी सदर स्कॉर्पिओला गंगा ढाब्याजवळ थांबण्याचा इशारा दिला. परंतु सदर स्कॉर्पिओ न थांबता पुढे भरधाव निघून गेली. त्यामुळे कर्मचार्‍यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून रावणटेकडी नजीकच्या   टोलनाक्याजवळ स्कार्पिओला थांबविले. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाला गाडीच्या कागदपत्राची मागणी करून गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले असता गाडीतील एकाने पोलिसांना देशी कट्टा दाखवून स्कॉर्पिओ गाडी घेवून पसार झाले. याबाबत वाहतुक पोलिसांनी ठाणेदारांना कळविले.

माहिती मिळताच शिवाजीनगर पोस्टेचे ठाणेदार ठाकूर यांनी कर्मचार्‍यासह सदर स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग केला. पोलिस मागे असल्याचे पाहताच सदर चोरटे नांदुरा मार्गावरील चिखली आमसरी जवळील  पुंडलीक बाबा मंदिराजवळ सदर स्कॉर्पिओ गाडी सोडून शेतात पसार झाले. पोलिसांनी शेतामध्ये चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. यावेळी गावकर्‍यांनीही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. मोहम्मद आजमिन मोहम्मद आसरू (24), मोहम्मद अब्दुल मो. माजिद (24), आसिफ हुसेन हारून हुसेन (25), अरशद खान रहेमान खान सर्व रा. हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर एका महिलेसह दोघे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ क्रमांक डीएल 4 सी एएफ 4943 मधून नगद 53 लाख रूपये, एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतुस, 6 मोबाईल, एक गॅस कटर असा माल जप्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच एएसपी श्याम घुगे, डिवायएसपी प्रदिप पाटील यांनी शिवाजीनगर पोस्टेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सदर चोरटे नागपूर येथील एटीएम फोडून चोरीचे पैसे घेवून जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस सदर चोरट्यांची कसुन चौकशी करत असून चोरीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: The amount of ATM lost in robbary in Nagpur