अमरावतीत ट्यूशन क्‍लासेसविरुद्ध पुन्हा कारवाईचा बडगा

file photo
file photo

अमरावती : शहरातील ट्यूशन क्‍लासेसना बाजार व परवाना विभागाची परवानगी तसेच फायर ऑडीटसाठी महापालिकेने पुन्हा कारवाईचा इशारा दिला आहे. केवळ अकरा क्‍लासेसनी आतापर्यंत फायर ऑडीटचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. उर्वरितांना 25 जुलैपर्यंत मुदत असून या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी करण्यात आली आहे. सर्व ट्यूशन क्‍लासेसना नोटीसेस बजावण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील सर्व ट्यूशन क्‍लासेसना फायर ऑडीट करणे बंधनकारक केले आहे. प्रतिष्ठीत अकरा क्‍लोससना सीलही लावण्यात आले होते. त्यानंतर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने विनंती केल्याने फायर ऑडीट, बाजार व परवाना विभागाकडून व्यावसायिक परवान्यासाठी मुदत देण्यात आली. सुरक्षेच्या उपाययोजना करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मागितले आहे. मात्र केवळ सील केलेल्या क्‍लासेसच्या संचालकांनीच प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र उपाययोजना पूर्ण झाल्याचे कळविलेले नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्रही सादर न करणाऱ्या व उपाययोजना न करणाऱ्या क्‍लासेसविरुद्ध कारवाई करण्याचे निश्‍चित झाले आहे.
संघटनेने महापालिकेस दिलेल्या माहितीनुसार शहरातील दीडशे क्‍लासेस संघटनेचे सदस्य आहेत. यातील अकरा वगळता उर्वरितांनी महापालिकेच्या सूचनेला गांभीर्याने घेतले नसल्याने कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. सहायक आयुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वातील समितीने सर्व टयूशन क्‍लासेंसना नोटीसेस बजावण्यास प्रारंभ केला असून 30 जुलैनंतर कारवाईस सुरुवात करण्यात येणार असल्याचे पीठे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com