अमरावती : ब्लॅकमेल करून युवतीवर अत्याचार

काही फोटोच्या आधारे पीडित युवतीला सातत्याने ब्लॅकमेल
crime against women
crime against womenesakal

अमरावती : आधीच विवाहित असल्याचे त्याने लपविले. माहिती झाल्यानंतर पत्नीला सोडून युवतीसोबत लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. काही फोटोच्या आधारे पीडित युवतीला सातत्याने ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण उजेडात आले.

महादेव प्रेमनाथ कांबळे (वय ३१, रा. मुंबई ) असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे शहर कोतवाली पोलिसांनी सांगितले. पीडित युवती एकटीच राहत होती. २०२० मध्ये फेसबुकवरुन महादेव कांबळे याची ओळख झाली. मॅसेंजर अ‍ॅपवर संपर्क करून त्याने युवतीचा नंबर प्राप्त केला. त्यानंतर सतत तीन महिन्यांपर्यंत त्या दोघांचे फोनवरुन एकमेकांशी बोलणे सुरू होते. त्याने अमरावतीच्या युवतीला तो मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याचे सांगून मैत्री सुरू ठेवली. हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

युवतीने महादेवला काही दिवसांनंतर फोन केला असता, तिला त्यावर महिलेचा आवाज आला. तिने महादेवची पत्नी बोलत असल्याचे युवतीला सांगितले. युवतीला संशयित महादेव अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवत होता. त्याच कालावधीत युवती अमरावतीत भाड्याची खोली करून राहत होती. एप्रिल २०२० मध्ये महादेव अमरावतीत आला. त्याने युवतीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

पीडित युवती २०२१ मध्ये अमरावतीवरुन अकोल्यात राहण्यास गेली. तेथे सुद्धा त्याने तिच्यावर अत्याचार केला. २०२२ मध्ये युवती परभणी जिल्ह्यात गेली. महादेवने तिथेही तिला गाठले. पुन्हा त्याने पत्नीला सोडून लग्न करण्याचे आश्वासन दिले, असा आरोप युवतीने पोलिसांत केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याने युवतीला मुंबईत आपल्या फ्लॅटवर बोलावून अत्याचार केल्याचा आरोप पीडित युवतीने तक्रारीत केला. शहर कोतवाली पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

बोलविन तेथे यावे लागेल

युवतीने संशयित महादेवला टाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यासोबत काढलेले फोटो नातेवाइकांना दाखविण्याची धमकी देऊन, मी बोलविन तेथे यावे लागेल. या शब्दात धमकी दिली. असा आरोप पीडितेने तक्रारीत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com