प्रेयसीला बदनामीची धमकी देऊन उकळले लाखो रुपये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

अमरावती : प्रियकराने प्रेयसीला बदनामीची धमकी देऊन तिच्याकडून 1 लाख 16 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी गाडगेनगर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. रौनक ऊर्फ नीतेश खोब्रागडे (रा. संमती कॉलनी) असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. पीडित मुलीच्या आईनेच याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. रौनकचे काही महिन्यांपासून परिसरातील युवतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते.

अमरावती : प्रियकराने प्रेयसीला बदनामीची धमकी देऊन तिच्याकडून 1 लाख 16 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी गाडगेनगर पोलिसांनी प्रियकराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. रौनक ऊर्फ नीतेश खोब्रागडे (रा. संमती कॉलनी) असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. पीडित मुलीच्या आईनेच याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. रौनकचे काही महिन्यांपासून परिसरातील युवतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तिला विश्‍वासात घेऊन 1 डिसेंबर 2017 ते 7 ऑगस्ट 2018 या कालावधीत रौनकने प्रेयसीला विविध कारणे सांगून पैशाची मागणी केली. सुरुवातीला काही पैसे रौनकला दिल्यानंतर त्याची हिंमत वाढल्याने त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. दोघांमध्ये सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाबाबत लोकांना व नातेवाइकांना सांगेल, अशी धमकी देऊन रौनक ने तिच्याकडून टप्प्याटप्प्याने 10 व 3 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, 4 ग्रॅम सोन्याची चेन उकळली. त्यानंतर पीडित युवतीने वडील व आईच्या बॅंकखात्यामधून 82 हजार रुपये दोन टप्प्याटप्प्यात काढून ही रक्कमसुद्धा प्रियकराला मुलीने दिली.

Web Title: amravati blackmai news

टॅग्स