esakal | अमरावती जिल्हा बॅंकेचा शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अमरावती जिल्हा बॅंकेचा शेतकऱ्यांच्या पाठिशी राहण्याचा संकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. बॅंकिंग सांभाळतानासुद्धा शेतकऱ्यांच्या पाठिशी राहून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प रविवारी (ता.1) झालेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आमसभेत व्यक्त करण्यात आला.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ विभागीय सहकारी बोर्डाच्या सभागृहात रविवारी जिल्हा बॅंकेची वार्षिक आमसभा पार पडली. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा मिळालेली नाही. अनेकजण त्यामुळेच नव्याने कर्ज घेऊ शकले नाहीत. मात्र, जिल्हा बॅंक शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. सभेत शेतकऱ्यांची कर्जमाफी, बॅंकेचा नफा, नापिकी तसेच अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. बॅंकेचे सभासद हिंमत घोम तसेच अजय कडू, सुशील काळे आदींनीसुद्धा प्रश्‍न मांडले.

loading image
go to top