Election Results 2019 : कृषिमंत्र्यांचा विजयासाठी संघर्ष, अपक्षाची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अमरावती : जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघांत काट्याची टक्कर असून मेळघाटात अपक्ष उमेदवार व माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जवळपास मैदान मारले आहे. तिवश्‍यातून शिवसेनेचे राजेश वानखडे सध्या आघाडीवर असून आमदार यशोमती ठाकूर मागे आहेत. बडनेरा मतदारसंघात अपक्ष आमदार रवी राणा सध्या समोर असून शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्याशी त्यांची काट्याची टक्कर सुरू आहे. अमरावती मतदारसंघात भाजपचे डॉ. सुनील देशमुख विरुद्ध कॉंग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यात लढत रंगली असून सध्या डॉ. देशमुख पुढे आहेत. दर्यापूर मतदारसंघात कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांनी भाजपचे रमेश बुंदिले यांना मागे सारले आहे.

अमरावती : जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघांत काट्याची टक्कर असून मेळघाटात अपक्ष उमेदवार व माजी आमदार राजकुमार पटेल यांनी जवळपास मैदान मारले आहे. तिवश्‍यातून शिवसेनेचे राजेश वानखडे सध्या आघाडीवर असून आमदार यशोमती ठाकूर मागे आहेत. बडनेरा मतदारसंघात अपक्ष आमदार रवी राणा सध्या समोर असून शिवसेनेच्या प्रीती बंड यांच्याशी त्यांची काट्याची टक्कर सुरू आहे. अमरावती मतदारसंघात भाजपचे डॉ. सुनील देशमुख विरुद्ध कॉंग्रेसच्या सुलभा खोडके यांच्यात लढत रंगली असून सध्या डॉ. देशमुख पुढे आहेत. दर्यापूर मतदारसंघात कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांनी भाजपचे रमेश बुंदिले यांना मागे सारले आहे. तर मोर्शीत अतिशय अटीतटीची लढत सुरू असून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्याशी झुंज देत आहेत. धामणगावरेल्वे मतदारसंघात आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांना भाजपचे प्रताप अडसड यांनी कडवे आव्हान देत मागे टाकले आहे. तर अचलपूर मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांना कॉंग्रेसचे बबलू देशमुख यांनी सुरुवातीला मागे टाकले आहे. बहुतेक मतदारसंघात पाच फे-या आटोपल्या असून त्यात ही स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati district Election Results trends