या कारणामुळे बंद करावे लागले अमरावतीचे फॉरेस्ट ऑफिस...

amravati forest office closed
amravati forest office closed

अमरावती : सामाजिक वनिकरण कार्यालयातील चौकीदाराचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संबंधित कार्यालयासह मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय निर्जंतुकीकरणासाठी 24 तास बंद ठेवण्यात आलेले आहे.

बुधवारी (ता. दहा) रात्री प्राप्त अहवालामध्ये सामाजिक वनिकरण कार्यालयातील 55 वर्षीय व्यक्ती तसेच नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात मांजरी म्हसला येथील 16 वर्षीय मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. वनिकरणच्या संबंधित कर्मचाऱ्याची प्रकृती शनिवारपासून अस्वस्थ होती. त्याच्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला होता. संबंधित व्यक्ती सामाजिक वनीकरणाची असली तरी त्याचे वास्तव्य क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय परिसरात आहे.

त्याच्या आजूबाजूला वनविभागाचे आणखी चार कर्मचाऱ्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. चारही कुटुंबातील सदस्यांचे नमुने घेण्यात आलेले आहेत. पैकी दोन कर्मचारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात आहेत, तर संबंधित कर्मचाऱ्यांची उपवन संरक्षक कार्यालयात ये-जा होती. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय निर्जंतुकीकरणाकरीता 24 तास बंद ठेवण्यात आल्याचे उपवन संरक्षक गजेंद्र नरवणे यांनी सांगितले.

मांजरी म्हसला येथील 16 वर्षीय मुलास अस्वस्थ वाटत असल्याने त्याने गोपालनगर भागातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्या औषधीची रिऍक्‍शन आल्याने शहराच्या पश्‍चिम भागातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल होता. उपचारादरम्यान त्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला. तोसुद्धा पॉझिटिव्ह आला. परिणामी त्याचे आई-वडील, काका आणि मुलाला दुचाकीने ने-आण करणारा युवक, असे चौघांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com