काही झालं तरी, आम्ही प्रेमविवाह करणार नाही म्हणजे नाही...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

"युवकांपुढील आव्हाने' या विषयावर उद्‌बोधन सुरू असताना प्रा. प्रदीप दंदे यांनी युवकांपुढे अनेक आव्हाने असताना "मुलीवरील वाढते अत्याचार हेसुद्धा एक आवाहन आहे', असे सांगत एक घटना घडल्यावर दुसरी होणार नाही, असे वाटत असताना लगेच प्रेमप्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसून येतात.

चांदूररेल्वे (अमरावती) : तरुण मुलींची हत्या, अॅसिड हल्ले अशा सभोवताल घडणाऱ्या घटना लक्षात घेता प्रेमाची परिणती हत्येत होत असेल, तर ते प्रेम कसले? त्यामुळे महाविद्यालयीन मुलींनी प्रेमविवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ घेतली. एवढेच नाही तर दोन पाऊल पुढे जात सध्याच्या रीतिरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देऊन लावले तर भावी पिढीतील एक माता म्हणून माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही व मुलीसाठी हुंडा देणार नाही, अशीही शपथ व्हॅलेंटाइन्स डेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनींनी घेतली. 

 

Image may contain: one or more people and people standing
चांदूररेल्वे : शपथ घेणाऱ्या विद्यार्थिनींसह प्राध्यापक

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित चांदूररेल्वे येथील महिला कला-वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेंभूर्णी येथे सुरू आहे. या शिबिरात "युवकांपुढील आव्हाने' या विषयावर उद्‌बोधन सुरू असताना प्रा. प्रदीप दंदे यांनी युवकांपुढे अनेक आव्हाने असताना "मुलीवरील वाढते अत्याचार हेसुद्धा एक आवाहन आहे', असे सांगत एक घटना घडल्यावर दुसरी होणार नाही, असे वाटत असताना लगेच प्रेमप्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसून येतात. मुलींचा आपल्या आईवडिलांवर लग्न करून देणार नाही, असा विश्‍वास नाही का? असा प्रश्‍न विद्यार्थिनींना केला. त्यातून ही शपथ देण्यात आली.

आता गावकरी करणार वाघांशी दोन हात, ताडोबा व्यवस्थापनाने केली ही तयारी...
 

"व्हॅलेंटाइन्स डे' स्पेशल 
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ देशमुख महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी, विशेष निमंत्रित म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. अशोक पळवेकर, प्राचार्य राजेंद्र हावरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजय कापसे, सहकार्यक्रम अधिकारी ग्रंथपाल मीना देशमुख, प्रा. सीमा जगताप, प्रा. संजीव भुयार, जीवन शेळके, प्रा. नितीन अंभोरे, प्रा. लक्ष्मण सोळंके, प्रा. वैशाली देशमुख, प्रा. नेहा इंगळे उपस्थित होते. या वेळी शिबिरातील विद्यार्थिनी श्रेया वऱ्हेकर, भावना तायडे, मृणाल पाचखेडे, वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रुचिता रंगारी, पल्लवी सदबोरे, तेजस्वी बोबडे, भुवनेश्‍वरी देशमुख, अंकिता वानखडे, संगीता साऊतकर आदी शिबिरार्थिंनी आपले विचार व्यक्त केले. 

मुलींना जर कोणताही मुलगा त्रास देत असेल तर त्यांनी आधी आपल्या पालकांना कळविणे गरजेचे आहे किंवा त्याची तक्रार पोलिसांत केली तर वेळेवर कारवाई होईल आणि होणाऱ्या अवकृत्यापासून बचाव होईल. 
- विद्यार्थिनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati girls took oath not to go for love marriage