अमरावती : मुंबईत सत्तासंघर्ष शिगेला, मोर्शीत आमदारांचा साखरपुडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Devendra Bhuyar wedding engagement ceremony

अमरावती : मुंबईत सत्तासंघर्ष शिगेला, मोर्शीत आमदारांचा साखरपुडा

दर्यापूर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना तसेच सर्वच आमदारांना तातडीने मुंबईला उपस्थित राहण्याचे आदेश असताना वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले आहेत. दर्यापूर येथे त्यांचा साखरपुडा पार पडला. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्या एका मताच्या जोरावर संजय राऊत यांना भिडणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार राज्यात राज्यसभा निवडणुकीदरम्यान चर्चिले गेले होते. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे.

सरकारचे काय होणार, याबाबत क्षणाक्षणाला घडामोडी घडत आहेत. त्यातच मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दर्यापुरातील कन्येशी विवाहबद्ध होण्याचा निश्चय केला आहे. या संबंधातील साक्षगंध सोहळा बुधवारी इंद्रप्रस्थ लॉन येथे झाला. दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील राणे कुटुंबातील मुलगी आता आमदार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी म्हणून ओळखली जाणार आहे. लवकरच त्यांचा विवाह होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते मोर्शी मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Web Title: Amravati Independent Mla Devendra Bhuyar Wedding Engagement Ceremony

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top