अमरावती परिमंडळात 68 कोटींचा भरणा 

चेतन देशमुख - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

यवतमाळ - पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, शासकीय कार्यालयात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा कर व बिल भरण्यासाठी घेण्यात आल्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर वीज महावितरण कंपनीच्या अमरावती परिमंडळात तब्बल 68 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. 

केंद्र शासनाने 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. केवळ अत्यावश्‍यक सेवेत येणाऱ्या ठिकाणी नोटा स्वीकारल्या गेल्या. शासनाने अत्यावश्‍यक सेवेत नोटा घेण्याचे आदेश दिले असले, तरी अनेक ठिकाणी नकारात्मक उत्तर नागरिकांना मिळाले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. वीजबिल, पाणी व गृहकर, प्रवास आदी ठिकाणी नोटा घेण्यात आल्यात. त्यामुळे महावितरणकडे बिलाचा भरणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे 68 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. अमरावती परिमंडळातील यवतमाळ येथे 29 कोटी 44 लाख, तर अमरावती जिल्ह्यात 38 कोटी 50 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. 

"डिमांड'पेक्षा कमी जमा 
अमरावती परिमंडळात महावितरणची दर महिन्यांची डिंमाड 80 कोटी 75 लाख रुपयांची आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत वीजबिल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे वसुली पूर्ण होणार, असे चित्र दिसून येत होते. मात्र, त्यानंतर गती मंदावली. त्यामुळे उद्दिष्टांपैकी केवळ 68 कोटी रुपयांचा भरणा महावितरणकडे झाला आहे. 

Web Title: Amravati mseb zone 68 crore payment