अमरावती महापालिकेच्या आमसभेत रामाचा जयजयकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

अमरावती - आमसभा सुरु होताच एमआयएमच्या सदस्यांनी आर्थिक दुर्बल मुस्लिम घटक या शिर्षांतर्गत तरतूद वाढवून देण्याचा मुद्दा उपस्थित केला. शिव व भीम टेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तरतूद करण्यात येते. मुस्लिम भागातील विकासासाठी का नाही असा आक्षेप गटनेते अ.नाजीम यांनी घेतला. यावर सेनेचे गटनेते प्रशांत वानखडे यांनी हा शिर्ष धर्म किंवा पंथावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले. तर भाजपच्या तुषार भारतीय यांनी धर्माच्या नावाने तरतूद करणारी राज्यातील पहीली मनपा आहे असा ऊल्लेख करीत हा शिर्ष रद्द करा आसे मत मांडले. यावरून सभागृहातत गदारोळास सुरुवात झाली.

अमरावती - आमसभा सुरु होताच एमआयएमच्या सदस्यांनी आर्थिक दुर्बल मुस्लिम घटक या शिर्षांतर्गत तरतूद वाढवून देण्याचा मुद्दा उपस्थित केला. शिव व भीम टेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तरतूद करण्यात येते. मुस्लिम भागातील विकासासाठी का नाही असा आक्षेप गटनेते अ.नाजीम यांनी घेतला. यावर सेनेचे गटनेते प्रशांत वानखडे यांनी हा शिर्ष धर्म किंवा पंथावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले. तर भाजपच्या तुषार भारतीय यांनी धर्माच्या नावाने तरतूद करणारी राज्यातील पहीली मनपा आहे असा ऊल्लेख करीत हा शिर्ष रद्द करा आसे मत मांडले. यावरून सभागृहातत गदारोळास सुरुवात झाली. या गदारोळात एमआयएमच्या सदस्यांनी वेलमधे खाली बसून ठीय्या मांडला. त्यामुळे गदारोळात आणखी भर पडली. 

दरम्यान, एमआयएमचे सदस्य तरतूद करा ही मागणी लावून धरत असताना भाजपच्या सदस्यांनी जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या घोषणा देण्यास प्रारंभ  केला. यामुळे सभागृहातील गोंधळात वाढ झाली. अखेर महापौरांनी सभा स्थगीत केली.

Web Title: the Amravati Municipal General Assembly