डोक्‍यात माजले संशयाचे काहूर, त्यातून घेतला हा टोकाचा निर्णय...

Amravati : Murder of a woman in Warud
Amravati : Murder of a woman in Warud

वरुड (जि. अमरावती) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरातील गजानन नगरच्या मागील बाजूला घडली. याप्रकरणी पतीला वरुड पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

शहरातील गजानननगर परिसराच्या मागील बाजूला रमेश धुर्वे, त्याची पत्नी आणि दोन मुले असा परिवार राहात होता. गेल्या काही दिवसांपासून रमेश पत्नी शारदा ऊर्फ दुर्गा हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. लहान सहान गोष्टीवरून पत्नीची उलटसुलट विचारपूस करणे, ती कुठेही गेली असता आल्यावर तिच्यासोबत भांडण उकरून काढणे, छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करायचा.

पतीच्या सततच्या छळाला शारदा कंटाळली होती. शनिवारी (ता. 30) रात्री दहाच्या सुमारास दोघांचे कडाक्‍याचे भांडण झाले. भांडण सुरू असतानाच रमेशने फावडा आणि पोते उचलण्याच्या हूकच्या सहाय्याने तिच्या शरीरावर सपासप वार केले. केलेले वार एवढे भयानक होते की, शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. शारदा उर्फदुर्गा हिच्यावर पतीने धारदार शस्त्राचे वार केल्याचे लक्षात येताच काही नागरिकांना तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारार्थ अमरावती येथे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत शारदाचा भाऊ मंगेश गुलाबराव परतेती रा.मारुड, ता. पांढुर्णा, जि. छिंदवाडा (म.प्र.) यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी रमेश मंगल धुर्वे (वय. 35, रा. वरुड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.


घटनास्थळी ठाणेदार मगन मेहते, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संघरक्षक भगत, रवींद्र धानोरकर, शेषराव कोकडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com