मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्याने विद्यार्थिनीला धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

अमरावती : काही दिवसांपासून पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे चिडलेल्या अल्पवयीनांनी पीडित विद्यार्थिनीला अडवून जिवे मारण्याची धमकी दिली.

अमरावती : काही दिवसांपासून पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. त्यामुळे चिडलेल्या अल्पवयीनांनी पीडित विद्यार्थिनीला अडवून जिवे मारण्याची धमकी दिली.
फ्रेजरपुरा हद्दीत राहणारी 14 वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर एकटीच कॉंग्रेसनगर मार्गाने घराकडे जात होती. दरम्यान, दोन अल्पवयीन गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत होते. सुरुवातीला पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, फरक न पडल्याचे बघून त्या दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध शाळा मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदविली. मुख्याध्यापकांनी पाठलाग करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांना समज दिली. त्यामुळे चिडलेल्या दोन्ही मुलांनी पुन्हा या विद्यार्थिनीला अडविले व धमकी दिली. त्यामुळे पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध विनयभंग, अडवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोन्ही अल्पवयीन मुलांना ठाण्यात बोलावून चौकशी करीत त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पथ्रोटमध्ये विद्यार्थिनीची छेडखानी
शाळेला जाण्यासाठी ऑटोची वाट बघत असलेल्या एका 14 वर्षांच्या विद्यार्थिनीला शकील शहा वल्द मदार शहा (वय 31) याने दुचाकीने सोडून देण्याचा आग्रह धरला. यासह तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला, असा आरोप पीडितेने तक्रारीतून केला आहे. पथ्रोट पोलिसांनी शकील शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: amravati news

टॅग्स