दादासाहेब गवई यांचे स्मारक ज्ञानकेंद्र व्हावे : मुख्यमंत्री

अमरावती ः रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर
अमरावती ः रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर

अमरावती : दादासाहेब गवई ज्ञानी होते. त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणीव यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांचे स्मारक "ज्ञानकेंद्र' म्हणून ओळखले जावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आज रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. या वेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, आमदार अरुण अडसड, डॉ. अनिल बोंडे, रवी राणा, ऍड. यशोमती ठाकूर, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, वीरेंद्र जगताप, महापौर संजय नरवणे, कमलताई गवई, डॉ. राजेश जयपूरकर, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, दादासाहेब गवई यांनी आमदार, खासदार, सभापती, राज्यपाल म्हणून काम केले. ते ज्या पदावर गेले, त्या पदाचा सन्मान वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. बिहारमध्ये राज्यपाल असताना त्यांनी प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोग राबविले. त्यांच्या या कार्याची आठवण आजही काढली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार उच्चशिक्षित पिढी तयार होण्यासाठी त्यांनी नागपूर येथे महाविद्यालय सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तेथे शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक वाढ झाली. त्यामुळे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा नागपुरातील आंबेडकर महाविद्यालयाकडे असतो.
दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. ज्या काळात संसाधने नव्हती, निधीची कमतरता होती, अशा कठीण काळात जगाला अभिमान वाटावा, असे स्मारक उभे राहिले. जगभरातील पर्यटक नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दर्जा स्मारकाला मिळाला आहे. दादासाहेब गवई हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सर्वांसोबत कौटुंबिकस्नेह जपला. विचारांची देवाण-घेवाण अन्‌ सौहार्दतेमुळे एका उंचीचा सभापती राज्याला लाभल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com