पृथ्वीराज, अशोक चव्हाण थोडक्‍यात बचावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

अमरावती : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता.5) डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला. या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रवास करीत होते.

यासंदर्भातील माहितीनुसार कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची बस मोर्शीहून निघाली होती. त्यानंतर ही बस खानापूरमध्ये दोनदा थांबली. ही बस खानापूरहून निघताच गावाच्या वेशीवर एक डंपर समोर आला. रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी अतिशय अरुंद भागातून वाहतूक सुरू होती. या रस्त्यावरून एकाचवेळी बस आणि डंपर जाऊ शकत नाहीत, हे लक्षात येताच डंपर चालकाने प्रसंगावधान राखले. त्याने डंपर डाव्या बाजूला घेतला. त्यामुळे बस आणि डंपरची समोरासमोर होणारी धडक टळली. डंपर चालकाने आपले वाहन अचानक डाव्या बाजूला घेतल्याने तो थोडासा कलंडला. डंपरची धडक बसली असती, तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, वरिष्ठ नेते थोडक्‍यात बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Web Title: amravati news