शिक्षणमंत्री, आमदारांच्या पोस्टरला फासले वंगण

वरूड : पोस्टरला काळे फासताना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी.
वरूड : पोस्टरला काळे फासताना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी.

वरुड : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आल्याचा केवळ देखावा हे सरकार करीत असून तालुक्‍यातील केवळ 150 विद्यार्थ्यांना फी माफीसाठी पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार अनिल बोंडे यांच्या पोस्टरला वंगण फासून निषेध नोंदविला. या आंदोलनाने शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीचा जो गाजावाजा केलेला आहे ती विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्‍यातील दहा हजार विद्यार्थ्यांमधून केवळ 162 विद्यार्थी शैक्षणिक शुल्क माफीमध्ये पात्र ठरत असतील तर उर्वरित विद्यार्थी अन्य देशातून आयात केलेले आहेत काय, असा सवाल सुद्धा यावेळी करण्यात आला. संतप्त झालेल्या स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे व स्थानिक आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पोस्टरवर तोंडाला वंगण फासून सरकारचा निषेध केला. आंदोलनामध्ये स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख सागर राऊत, पवन ठाकरे, कपिल परिहार, सचिन डोके, गौरव कानडे, किशोर घाटे इत्यादी कार्यकर्त्यांसमवेत महात्मा फुले महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com