भूजलवाढीसाठी डॉक्‍टरांनी उचलला विडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

अमरावती : दुष्काळाचे चटके आता ग्रामीणांसोबतच शहरवासीयांनासुद्धा बसू लागले आहेत. पाण्याचा अपव्यय होत असल्याने भविष्य सुरक्षित नसल्याची जाणीव प्रत्येकालाच झालेली आहे. त्या अनुषंगाने आता समाजघटक जलसंधारणासाठी पुढे येत आहेत. अमरावती शहरातील डॉक्‍टरांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरात शोषखड्ड्यांचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी "जलजीवन फाउंडेशन'ची स्थापना करून या मंडळींनी घरातील सांडपाण्याचा जमिनीतच निचरा करण्याबाबत उपक्रम सुरू केला आहे.

दरवर्षी होणारे कमी पर्जन्यमान, त्यात पाण्याचा अती वापर यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. ती भरून काढण्यासाठी घरातील सांडपाण्याचा शोषखड्ड्यांमधून जमिनीत निचरा करण्याचा संकल्प शहरातील डॉक्‍टरांनी केला आहे. यासाठी प्रथम टप्प्यात त्यांनी स्वतःच्या घरासोबतच राजापेठ परिसरातील सुमारे 100 घरांमध्ये हा प्रयोग सुरू केला आहे. घराच्या आवारात पाच फुटांचा खड्डा करून त्यात प्लॅस्टिकचा लहान ड्रम बसविण्यात आला. घरातील सांडपाणी त्यामध्ये सोडून ते जमिनीत मुरविण्यात येते. जलजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आशीष मशानकर, डॉ. आशीष डगवार, डॉ. राजेश मुंदे, डॉ. नितीन दातीर, डॉ. सतीश भागवत, रणजित जव्हेरी, विनोद जयस्वाल, सतीश देशमुख आदी मंडळींनी पुढाकार घेत ते लोकांच्या घरोघरी जाऊन शोषखड्डे तयार करून न्हाणीघर, स्वयंपाकघर तसेच घरातील अन्य ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविण्याबाबत जागृती करीत आहेत. विशेष म्हणजे डॉक्‍टरांनी हे कार्य हाती घेतल्याने सर्वसामान्यांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या फाउंडेशनमध्ये डॉ. राजीव मुलमुले, डॉ. स्वप्नील खोंड, नितीन भटकर, रूपेश जव्हेरी, डॉ. अनुपमा देशमुख, डॉ. अर्चना मशानकर, डॉ. सोनाली डगवार, डॉ. अंजली खोंडे, डॉ. भाग्यश्री मुंदे, डॉ. कांचन भागवत आदींनी जूनपर्यंत जलसंधारणाचा संकल्प केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati news