श्‍वानांच्या नसबंदीत अमरावती अव्वल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

अमरावती - शहरातील श्‍वानांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने केलेल्या निर्बीजीकरणाची मोहीम देशभरात अव्वल दर्जाची ठरली. ऐंशी टक्के मादी श्‍वानांची नसंबदी करण्यात आली; आता नर श्‍वानांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

अमरावती शहरातील श्‍वानांची नेमकी संख्या उपलब्ध नसली, तरी सन २०१२ मधील पशुगणनेच्या आधारे नर व मादी श्‍वानांच्या नसबंदीचे प्रमाण २० ः ८० टक्के आहे, ते देशभरात अव्वल ठरले. महापालिकेच्या पशुवैद्यक विभागाकडील माहितीच्या आधारे १९ मे २०१६ ते ९ जुलै २०१७ या कालावधीत शहरातील १० हजार ८७० श्‍वानांची नसबंदी करण्यात आली. यात २ हजार ९९८ नर व ८ हजार ६७२ मादींचा समावेश आहे. व्हेट्‌स फॉर ॲनिमल व लक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल वेलफेअर या संस्थेकडे निर्बीजीकरणाचे काम सोपविण्यात आले. व्हेट्‌सने २ हजार ४३ नर व ५ हजार ९६१ मादी; तर लक्ष्मीने ११५ नर व २ हजार ७०१ मादींची नसबंदी केली. सध्या या दोन्ही संस्थांना मादी श्‍वान मिळत नसल्याने नर श्‍वान शोधून त्यांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. २०ः ८० हे प्रमाण ६० ः ४० वर आणण्याची योजना आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीवरून श्‍वान पकडून त्यांची नसबंदी केली जाणार आहे.

Web Title: amravati news dog

टॅग्स