भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

अमरावती- मुंबई एक्सप्रेस महामार्ग क्रमांक ६ वर भरधाव वाहनांच्या धडकेत एक मादी बिबट्या ठार झाली. छत्री तलावाजवळ असलेल्या जंगलातून ती महामार्गावर आली होती. या बिबट्याजवळ एका रानडुकराचंही शव आढळले. आज (मंगळवार) सकाळी या परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना ही घटना सर्वप्रथम लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित वनविभागाला कळवली. वनविभाच्या पथकाने पंचनामा करून बिबट्याचं शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या मादी बिबट्याने रानडुकराची शिकार केली होती. ही शिकार करून जंगलाकडे जात असताना अमरावती-मुंबई एक्सप्रेस महामार्ग क्रमांक ६ वर अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, या बिबट्याच्या अंगावरील कातडीही सोलून निघालेली दिसत होती.

Web Title: amravati news leopard killed in accident