अमरावती विभागात दुष्काळाला अलविदा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

अमरावती : अमरावती विभागाचा दुष्काळाचा कलंक यंदाच्या पैसेवारीने पुसला आहे. विभागाची अंतिम पैसेवारी 70 टक्के असल्याचे शनिवारी (ता. 31) शासनाला कळविण्यात आले.

गत पंचवार्षिकीपैकी एका वर्षाचा अपवाद वगळता चार वर्षे अमरावती विभाग दुष्काळाच्या खाईत लोटला गेला होता. न्यायालयाने फटकारल्यानंतर शासनाने गतवर्षी कण्हत दुष्काळ जाहीर केला. त्याची मदत शासन अद्याप देऊ शकलेले नाही. 

शासनाने गतवर्षी बदललेल्या धोरणानुसार 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर केली. विभागातील 7,367 पैकी 7,219 गावांच्या पीकपरिस्थितीचा आढावा या पैसेवारीसाठी घेण्यात आला. जिल्हानिहाय अमरावती व वाशीम प्रत्येकी 70, यवतमाळ 60, अकोला 69 तसेच बुलडाणा 82 टक्के पैसेवारी जाहीर करण्यात आली. विभागाची सरासरी पैसेवारी 70 आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाला कळविण्यात आली. विभागीय आयुक्त जगदीश प्रसाद गुप्ता पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे म्हणाले.

Web Title: Amravati is now drought free