देहविक्रीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; तरुणींसह खोली भाड्याने देणारी महिला अटकेत

Amravati police released two young women
Amravati police released two young women

अमरावती : शहरातील खंडेलवालनगर, शाहू ले-आऊट नजीकच्या परिसरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या ठिकाणावर आयुक्तालयातील गुन्हेशाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. तेथून तरुणींसह एका युवकास पोलिसांनी अटक केली.

मागील काही दिवसांपासून या परिसरात आंबटशौकिनांची बऱ्यापैकी वर्दळ वाढली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत होता. बडनेरा पोलिसांकडून कारवाईला कुणी जुमानत नसल्याचे बघून परिसरातील काही नागरिकांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. परिसरातील घरात खरोखरच देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली.

येथे एक महिला आंबट शौकीनांकडून पैसे घेत असल्याची खात्री केली. दोन बनावट ग्राहक तयार केले. येथील प्रमुख महिलेकडे मुली पुरविण्याची मागणी केली. त्यासाठी तिला पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे तीन हजार रुपये ग्राहकांनी दिले. त्याचवेळी पोलिसांनी परिसरातील त्या घरावर छापा टाकला असता दोन युवतींसह एक युवक संशयास्पद अवस्थेत येथे आढळला.

घटनास्थळावरून तीन हजार रुपये, दोन मोबाईल अशी एकूण २३ हजार रुपयांची सामुग्री पोलिसांनी जप्त केली. ग्राहकांना शरीरसंबंधासाठी खोली भाड्याने देण्याचाही गोरखधंदा सुरू असल्याची बाबही पोलिसांच्या निदर्शनात आली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी घटनेसंदर्भात बडनेरा पोलिसांना माहिती दिली.

बडनेरा पोलिसांनी येथील एका महिलेसह संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, असे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. अटकेत असलेली व्यक्ती मुळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाई करून गुन्हा दाखल
नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नियमानुसार कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. नमुद दोघांसह अन्य काहींचे बयाण याप्रकरणी नोंदविले आहे.
- पंजाब वंजारी,
पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com