अमरावतीतून पावणेचार लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अमरावती : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. 24) सकाळी चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्स प्रतिष्ठानावर छापा टाकून पावणेचार लाखांचा गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. प्रकरणी राजा ट्रेडर्सचा संचालक मोहसीन खान मोबीन खान (वय 36, रा. नमुना गल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा असून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाला मिळाली होती.

अमरावती : अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी (ता. 24) सकाळी चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्स प्रतिष्ठानावर छापा टाकून पावणेचार लाखांचा गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला. प्रकरणी राजा ट्रेडर्सचा संचालक मोहसीन खान मोबीन खान (वय 36, रा. नमुना गल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. चांदणी चौक येथील राजा ट्रेडर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा असून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाला मिळाली होती. सहआयुक्त अन्नापुरे व सहायक आयुक्त केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी भाऊराव चव्हाण, राजेश यादव व सीमा सूरकर यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेअकराला राजा ट्रेडर्सवर छापा टाकला. झडतीदरम्यान, प्रतिष्ठानात विविध ब्रॅंडनेमचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आदी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. पथकाने 3 लाख 77 हजार 380 रुपयांचा हा साठा जप्त केला.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati seized Rs 4 lakh Gutkha