टॉवरवर चढून युवकाची वीरूगिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

अमरावती : ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी नीलेश भेंडे या युवकाने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून विरूगिरी केली. यावेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या नाट्यामुळे प्रशासन मात्र तब्बल सात तास वेठीस धरले गेले. तक्रारकर्ते खासदार आनंदराव अडसूळ यांनी तक्रार मागे घेण्याचे पत्र दिल्यानंतर सदर तरुण खाली उतरला.

आमदार रवी राणा व खासदार अडसूळ यांच्यात सध्या चांगलाच वाद पेटला आहे. या वादातूनच खासदारांनी केलेल्या तक्रारीवरून रवी राणा व अन्य चार जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात नीलेश भेंडे याचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे गुन्हा मागे घेण्यासाठी नीलेशने हे आंदोलन केले. जोपर्यंत ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका नीलेशने घेतली. त्यामुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. नीलेशसोबत संवाद साधण्यासाठी एक युवकही टॉवरवर चढला होता.
अखेर ऍट्रॉसिटी ऍक्‍टच्या कलम 3 अंतर्गत दाखल तक्रार विनाअट मागे घेत असल्याचे पत्र खासदार अडसूळ यांनी पोलिस आयुक्तांना दिल्यानंतर या युवकाने आंदोलन मागे घेतले.

Web Title: Amravati Tower News