अमरावती विद्यापीठ : 60 हजार विद्यार्थ्यांचे नामांकन होणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले नामांकन ऑनलाइन करायचे आहे. 60 हजार विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात ऑनलाइन सुविधेचा फायदा घेता येणार आहे. तसेच हिवाळी परीक्षांचे आवेदनपत्रसुद्धा ऑनलाइन भरण्यासाठी विद्यापीठाने ही मुदत 20 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले नामांकन ऑनलाइन करायचे आहे. 60 हजार विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात ऑनलाइन सुविधेचा फायदा घेता येणार आहे. तसेच हिवाळी परीक्षांचे आवेदनपत्रसुद्धा ऑनलाइन भरण्यासाठी विद्यापीठाने ही मुदत 20 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने चालू सत्र 2019-20 पासून त्यांच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयात विद्यार्थी प्रथम वर्षात प्रवेशित होत असेल, तर त्याला प्रथम यंदा ऑनलाइन नामांकन करावे लागणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी यांच्याकरिता ऑनलाइन सुविधा कशी उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचा उपयोग कसा करायचा यासाठी विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात कार्यशाळाही घेतली. या कार्यशाळेत ऑनलाइन परीक्षा आवेदनपत्र व एन्‍रॉलमेंट ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, यासाठी उपयुक्‍त माहिती दिली. या चालू सत्रात यंदा बीए, बीकॉम, बीएससी व अभियांत्रिकी शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाइन नामांकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षी बीए, बीकॉम, बीएस्सी व अभियांत्रिकी शाखा मिळून 60 हजार विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. प्रथम वर्षात प्रवेशित झालेले विद्यार्थी आपले नामांकन अर्ज आता ऑनलाइन भरत असून ही सुविधा त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्‍त ठरणार असल्याचे परीक्षा विभागाने म्हटले आहे. तसेच परीक्षा आवेदनपत्र ही आता ऑनलाइन भरावे लागत असल्याने परीक्षा विभागातील थोडाफार ताण कमी होणार आहे. परीक्षा विभागात मनुष्यबळ कमी असल्याने ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने परीक्षांची कामेही त्वरित निकाली निघणार आहेत.

प्रथम वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना या चालू सत्रात नामांकन ऑनलाइन रजिस्टर करावे लागणार आहे. यासाठी कार्यशाळा राबविण्यात आली असून, या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या सत्रात 60 हजार विद्यार्थी आपले नामांकन ऑनलाइन नोंदणी करणार आहेत.
- डॉ. हेमंत देशमुख
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati University: 60 thousand students will be enrolled online