बारावी फेरपरीक्षा उत्तीर्णांसाठी जादा तुकड्या

File photo
File photo

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उशिरा प्रवेश देण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. 23 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेता येणार आहे. 12 वी फेरपरीक्षेचा निकाल लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रवेशाबाबतची मागणी वाढली. याशिवाय जलदगती अतिरिक्त तुकडीला शासनाकडून मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे.
महाविद्यालयीन परीक्षा रद्द झाल्यामुळे वार्षिक परीक्षेचे सत्र परीक्षेत रूपांतर झाल्यामुळे व माइंड लॉजिककडून परीक्षेची कामे काढून घेण्यात आल्यामुळे परीक्षा विभागावर ताण पडला आहे. विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल लावण्यास उशीर झाल्यामुळे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एफ. सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती.
विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची वाढलेली मागणी विचारात घेता तसेच विद्यापीठातील परीक्षांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उशिरा प्राप्त झाल्यामुळे त्यांना प्रवेश घेण्याकरिता उपलब्ध असलेला अल्पावधी त्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. याकरिता प्रवेशासाठी 23 सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयातील रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली. त्यानुसार कुलगुरूंनी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश करून 24 सप्टेंबर 2019 पर्यंत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नावांची वर्गनिहाय यादी प्राचार्यांच्या शिफारशीसह व स्वाक्षरीनिशी दोन प्रतींमध्ये कुलगुरूंच्या कार्येत्तर मान्यतेसाठी सादर करावयाची आहे. त्याची एक प्रत नामांकनासाठी परीक्षा विभागात सादर करावयाची आहे. ही मुदतवाढ पदवी व पदव्युत्तर तसेच पुनर्मूल्यांकनामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा लागू राहणार आहे. सदर मुदतवाढ ही सत्र 2019-20 करिताच लागू आहे.
ज्या अभ्यासक्रमांचे प्रवेश शासनाच्या केंद्रीय प्रवेश समितीद्वारे केले जातात, त्यांना सदर मुदतवाढ लागू राहणार नाही. विद्यापीठाचे अध्यादेश आणि निर्देशातील तरतुदीनुसार प्रवेशपात्रता तपासून व मंजूर प्रवेश क्षमतेतील रिक्त जागी प्रवेश देण्यात यावा आणि प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, याबाबत विद्यापीठाच्या वतीने सर्व संलग्नित महाविद्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश राहिले असतील, त्यांनी त्वरित संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाने आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com