अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा तीन टप्प्यांत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा तीन टप्प्यात होणार असून निवडणूक कालावधीतील पेपर तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत. ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पहिल्या पेपरला सुरुवात होणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यंदा साडेपाचशेपेक्षा जास्त परीक्षांचे नियोजन केले आहे. हिवाळी परीक्षेला सुमारे 3 लाख 75 हजार विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेसाठी 151 परीक्षा केंद्र होते, आता यामध्ये सहा परीक्षा केंद्र वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राची संख्या 157 एवढी होणार आहे.

हिवाळी परीक्षेचा पहिला टप्पा हा 17 ऑक्‍टोबरला सुरू होत असून या दिवशी कला, वाणिज्य व इतर शाखांचा पहिला पेपर होणार आहे. परीक्षेचा दुसरा टप्पा 17 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान, तर तिसरा टप्पा हा 15 डिसेंबरपासून सुरू होत आहे. निवडणूक कालावधीत 21 ते 23 ऑक्‍टोबर रोजी होणारे पेपर हे पुढे ढकलण्यात आले असून ते तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत. परीक्षेसाठी 157 परीक्षा केंद्रप्रमुख व 157 सहकेंद्रप्रमुख नियुक्‍त करण्यात येणार आहेत. परीक्षा ऑफलाइन असल्याने यंदा परीक्षा विभागाची चांगलीच कसरत होत आहे.

परीक्षा विभागात मनुष्यबळाचा अभाव
परीक्षा विभाग हा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मुख्य विभाग आहे. याच विभागात दरवर्षी विद्यापीठातून कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे परीक्षा विभागात मनुष्यबळाचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर परीक्षांची कामे करावी लागत आहे. परीक्षा ऑफलाइन असल्याने आता येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati University Winter Examination in three phases