अमरावती जिल्ह्यात 12 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

अमरावती - अमरावती जिल्ह्याच्या 12 ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला या निवडणुकीत यश मिळालेले नाही. अचलपूर तालुक्‍यातील निमदरी, देवगाव, पिंपळखुटा, कोठारा, धारणी तालुक्‍यातील भोंडीलावा, चांदूर रेल्वे तालुक्‍यातील कारला, पाथरगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्‍यातील हयापूर, जवळा बु., मोर्शी तालुक्‍यातील रिद्धपूर, गोराळा, ब्राह्मणवाडा येथे या निवडणुका झाल्या होत्या.

गडचिरोली जिल्ह्यात भाजपला भोपळा
गडचिरोली : कोरची तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला भोपळा मिळाला असून, कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारही पराभूत झाले. येथील बेलगाव, सातपुती व जामडी येथे निवडणूक पार पडली.

Web Title: amravati vidarbha news 12 grampanchyat election result declare