कोरोनाने रोजगार गेला अन् काम शोधता शोधता घडला हा अपघात...

amravati youth injured in accident
amravati youth injured in accident

अमरावती : शहरातील एका युवकावर कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे रोजगार गमविण्याची वेळ आली. कामाच्या शोधात तो घराबाहेर पडला. परंतु काम मिळाले नाही. शेतातील रस्त्याने जात असताना अचानक भोवळ येऊन विहिरीत पडला.

तेजस अशोक खंडारे (वय ३२, रा. सरस्वतीनगर, अमरावती), असे त्या युवकाचे नाव आहे. नांदगावपेठ पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी युवकास बाहेर काढले. सद्य:स्थितीत त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी तो शहरातील एका दुकानात कामाला होता. परंतु दोन ते अडीच महिन्यांपासून हाताला काम मिळत नाही. शिवाय असले नसलेले थोडेफार पैसेही संपले. त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे? या विवंचनेत तो युवक होता.

मंगळवारी (ता. २६) तेजस सकाळी बिझीलॅण्ड, सिटीलॅण्ड हे व्यापारी प्रतिष्ठान सुरू झाल्यामुळे तो त्याठिकाणी काम शोधण्यासाठी गेला. काही व्यापाऱ्यांना भेटून त्याने काम मागितले. परंतु कुणी त्याच्या मागणीला दाद दिली नाही. त्यामुळे घरी परत जाण्यापूर्वी तो पायदळ असल्याने नांदगावपेठ मार्गावरील एका मंदिराच्या ओट्यावर काही वेळ बसला. पुन्हा शेताच्या मार्गाने घराकडे परत जात असताना भोवळ येऊन कोरड्या विहिरीत पडून जखमी झाला, असे सहायक पोलिस निरीक्षक दत्ता देसाई यांनी स्पष्ट केले. परिसरातील नागरिकांनी नांदगावपेठ पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com