अमरावतीकर 13 ऑक्‍टोबरला धावणार हाफ मॅराथॉनमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

अमरावती : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेकडो अमरावतीकर राज्यस्तरीय हाफ मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. सन 2019 ची ही स्पर्धा 13 ऑक्‍टोबरला होणार असून या स्पर्धेमध्ये केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून क्रीडापटू सहभागी होणार आहेत.

अमरावती : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेकडो अमरावतीकर राज्यस्तरीय हाफ मॅराथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. सन 2019 ची ही स्पर्धा 13 ऑक्‍टोबरला होणार असून या स्पर्धेमध्ये केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून क्रीडापटू सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात मॅराथॉन असोसिएशनचे दिलीप पाटील यांनी सांगितले, मागील तीन वर्षांपासून अमरावती शहरात आयोजित करण्यात येत असलेली राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा निटनेटक्‍या आयोजनामुळे अल्पावधीतच धावपटूंमध्ये लोकप्रिय झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत ड्यूथलॉन, स्प्रींट ड्यूथलॉन या प्रकारांचा समावेश राहणार आहे. 13 ऑक्‍टोबरला मार्डी रोड ते गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंतच्या मार्गावर 21.1 किमी अंतराची हाफ मॅराथॉन, 10 किमी पॉवर रन, 5 किमी. लहान मुलांसाठी ड्रीम रन या गटांचा समावेश राहणार आहे.
विशेष म्हणजे यंदा महिलांसाठी 5 किमीची धावस्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली आहे. ड्यूएनलॉन व हाफ मॅरेॅथॉनमध्ये अचूक टायमिंगकरिता इलेक्‍ट्रॉनिक्‍स चिपचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला रनिंग टी शर्ट, फिनीशर मेडल, अल्पोपहार, एनर्जी ड्रिंक्‍स आदी साहित्य पुरवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रा. सुभाष गावंडे, किशोर वाठ, मुकुंद वानखडे, प्रा. अतुल पाटील, मनीष जामनेकर, पंकज उभाड, नरेंद्र दापूरकर, हनुमान गुजर, नाना उदापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravatikar will run in the Half Marathon on October 13