अमरावतीच्या ईएसआयसी औषधालयालाच हवे इंजेक्‍शन

संतोष ताकपिरे
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

अमरावती : अमरावती विभागाचे ठिकाण असूनही कामगार विमा योजनेच्या औषधालयाची (डिस्पेन्सरी) स्थिती बदलायला तयार नाही. औषधांचा येथे तुटवडा असतो. शिवाय सहा वर्षांपासून येथे इंजेक्‍शनचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे या औषधालयालाच आता इंजेक्‍शन देण्याची वेळ आली आहे.

खासगी उद्योग समूहातील कामगारांच्या वेतनातून दर महिन्याला ठरावीक रक्कम शासन कपात करते. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना याचा लाभ होतो. परंतु येथे रुग्णांची तपासणी न करता डॉक्‍टर, काय झाले एवढे विचारून, औषधे देतात किंवा संलग्नित रुग्णालयात रेफरचे पत्र देतात. संलग्नित रुग्णालये शासनाकडून किती देयके वसूल करतात याची कुणी विचारणा केली नाही. पट्टी बंधकाचे येथे पद आहे, पण जखमेवर बांधण्यासाठी आवश्‍यक कापूस अन्‌ पांढरी पट्टीच नसल्याने पट्टीबंधकाचे कामही बंद आहे.
फक्त दोनच डॉक्‍टरवर भार
जिल्ह्यात ईएसआयसीच्या सदस्यांची संख्या लक्षात घेता, येथील औषधालयात फक्त दोन महिला डॉक्‍टर आहेत. कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati's ESIC dispensary needs injection