आनंद साई सोसायटीत 4.96 कोटींचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरातील को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमधील अपहाराचे प्रकरण उघडकीस येणे नित्याची बाब झाली आहे. संचालकांकडूनच कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. आता हुडकेश्‍वर हद्दीतील आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये एकूण 4.96 कोटींच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी सोसायटीच्या पाच संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अध्यक्ष मिलिंद घोगरे (42), संचालक तृप्ती घोगरे दोन्ही रा. अयोध्यानगर, संजय भगत (49, रा. श्रीमहालक्ष्मीनगर, नरसाळा), धीरज नगरकर (43, रा. संजय गांधीनगर, रिंगरोडजवळ) आणि ज्ञानेश्‍वर उमरेडकर (57, रा. हाउसिंग बोर्ड कॉलनी सुजातानगर, बिनाकी ले-आउट) अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा विशेष लेखा परीक्षक विभागाच्या पडताळणीत हा अपहार समोर आला आहे. 1 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2017 दरम्यान आरोपींनी संगणमत करीत ठेवीदारांनी गुंतवलेल्या रकमेतून एकूण 4 लाख 96 लाख 45 हजार 816 रुपयांची लबाडीने उचल केली. हा प्रकार त्यांनी कधीही समोर येऊ दिला नाही. जिल्हा विशेष लेखा परीक्षक विभागाने सोसायटीचे परीक्षण केले असता, संपूर्ण सावळा-गोंधळ पुढे आला. या रकमेच्या उपयोगासंदर्भात संचालकांना माहिती देता आली नाही. या प्रकरणी विशेष जिल्हा परीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Sai Society 4.96 crore abduction