आनंदवार्ता...उपराजधानीला मिळाले 23 अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

गडचिरोली परिक्षेत्रात विजय राणे, कांजूर मार्गचे जनार्दन हेगडकर, खेरवाडीचे आनंद थिटे यांचा समावेश आहे. तर अमरावती परिक्षेत्रात रमाकांत खंडारे, महेश मछले, स्वप्निल ठाकरे, हेमराज कोळी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

नागपूर : पोलिस महासंचालक कार्यालयाने मुंबईतील 280 पोलिस उपनिरीक्षकांना सहायक पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती दिली. तसेच त्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली. उपराजधानील 23 आणि नागपूर परिक्षेत्राला 18 सहायक पोलिस निरीक्षक बदलून येणार आहेत. 

नागपूर शहरात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अन्टॉप हिलचे योगेश सानप, आरसीपी पथकाचे राजू बस्तावडे, टिळकनगरचे शंकर धायगुडे, जेजे मार्गचे सूरज देवकर, संतोष मुंढे, टॉम्बेचे राहुल सावंत, डीएन नगरचे सतीश गोडसे, ओशीवाराचे विलास मोटे, निर्मलनगरचे ज्ञानेश्वर ढवळे, माटुंगाचे मारुती शेळके, देवनारचे मयूरेश शिंदे, चारकोपचे रिजवान शाह, एमआयडीसीचे स्वप्निल भुजबळ, दादरच्या स्वरांजली खानकर, ओशीवाराचे श्रीकांत संघर्षी (कांबळे), कांदिवलीचे वैजीनाथ कुकडे, दादरचे नीलेश खेडकर, बांगूरनगरचे शीतलकुमार गायकवाड, निर्मलनगरचे अयूब संडे, कुलाबाच्या प्रियांका देवकर, गोरेगावचे संदीप पाटील, पवईच्या किशोरी माने, गोराई (मालाड) चे चंद्रकांत मेटे यांचा समावेश आहे.

पदोन्नती मिळाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पदोन्नतीसह बदलीसुद्धा झाल्याने अनेकांचा हिरमोडही झाला. गडचिरोली परिक्षेत्रात विजय राणे, कांजूर मार्गचे जनार्दन हेगडकर, खेरवाडीचे आनंद थिटे यांचा समावेश आहे. तर अमरावती परिक्षेत्रात रमाकांत खंडारे, महेश मछले, स्वप्निल ठाकरे, हेमराज कोळी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

नागपूर परिक्षेत्रातील अधिकारी 
भायकुलाचे प्रमोद शिंदे, पंतनगरचे प्रमोद रास्कर, भोईवाडाचे हेमंत पवार, अंधेरीच्या प्रचिती गडकरी, खेरवाडीचे सुशांत पाटील, विशेष शाखेचे पंकज बैसाने, गोवंडीच्या शुभांगी वाजे, साकीनाकाचे गणेश बैरागी, कुर्ल्याचे हरीश्‍चंद्र गावंडे, बांगुरनगरचे दीपक पाटील, भूषण पवार, आरसीएफचे महेश गावंडे, पार्क साईटच्या नीलम बाबर, साकीनाकाचे लक्ष्मण लोणारे, नेहरूनगरच्या भाग्यश्री कुळकर्णी, शेवरीचे नारायण तुरकुंडे, मालवणीचे राजकुमार बरडे, भांडूपच्या स्वप्ना नेवसे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandarwat ... The Nagpur receives 23 officers