प्राचीन इतिहासाचे संशोधन नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - बनवारीलाल पुरोहित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर - ‘प्राचीन भारतीय इतिहास : एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आधारित परिषद संशोधन कार्यातील मैलाचा दगड ठरेल. इतिहासाच्या संशोधनातून पुढे येणारी माहिती मनोरंजक, नव्या पिढीसाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला.

ज्योतिर्जिज्ञासा प्रतिष्ठानतर्फे घेतलेल्या ‘प्राचीन भारतीय इतिहास : एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ विषयावरील परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे येथील डेक्कन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद जामखेडकर, शरद हेबाळकर, बिपीन कामदार, डॉ. अनिरुद्ध वझलवार व अमर वझलवार उपस्थित होते.

खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र यासह विविध शास्त्रांच्या अभ्यासामुळे अधिकाधिक प्राचीन इतिहासाचे संशोधन शक्‍य झाले आहे. एकदिवसीय परिषदेतून नक्कीच उपयुक्त स्वरूपाची माहिती समाजापुढे येईल आणि त्यानिमित्ताने संशोधन कार्याला निश्‍चितच नवी ऊर्जा मिळेल. भारतीय संस्कृती प्राचीन असून, हजारो वर्षांपासून अस्तित्त्व टिकवून आहे. धर्माचा आधार आणि समाज व राष्ट्राचे हित हाच गाभा असल्याने भारतीय संस्कृती नामशेष करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले. विदेशी आक्रमकांनाही इथली संस्कृती मोडता आली नाही. देशातील प्रत्येक राज्यांना प्राचीन इतिहास व संस्कृती आहे, असेही पुरोहित म्हणाले. संचालन प्रभा देऊस्कर यांनी केले. अमित हेडा यांनी आभार मानले.

Web Title: The ancient history of inspiring a new generation of research