शेकाप कार्यकर्त्यांत संताप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

चामोर्शी (गडचिरोली) : निवडणुकीचा खर्च सादर न केल्याचे कारण दाखवून निवडणूक कर्मचाऱ्यासह पोलिसांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार जयश्री वेळदा यांना रविवारी (ता. 20) सायंकाळी त्यांच्या घरातून बळजबरीने गाडीत कोंबून नेल्याचा आरोप शेकापचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते यांनी केला आहे. 

चामोर्शी (गडचिरोली) : निवडणुकीचा खर्च सादर न केल्याचे कारण दाखवून निवडणूक कर्मचाऱ्यासह पोलिसांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार जयश्री वेळदा यांना रविवारी (ता. 20) सायंकाळी त्यांच्या घरातून बळजबरीने गाडीत कोंबून नेल्याचा आरोप शेकापचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते यांनी केला आहे. 
शेकापच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जराते यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक विभागाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जयश्री वेळदा यांनी दोन दिवसांपासून आपला खर्च सादर केला नव्हता तसेच त्यांची खर्चाची फाईल निवडणूक विभागात पडली होती. दरम्यान, आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास निवडणूक पथकाचे कर्मचारी पोलिस बळाचा वापर करून जयश्री वेळदा यांना बळजबरीने आपल्या वाहनातून त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. या वेळी महिला कर्मचारीसुद्धा सोबत नव्हत्या. सायंकाळी सहानंतर महिलांना चौकशीसाठी पोलिसांना ताब्यात घेता येत नाही किंवा कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता उमेदवाराला उचलून नेणे ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती रामदास जराते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई सत्तापक्षाच्या दबावाखाली केल्याचा आरोपही त्यांनी 
केला. उचलून नेलेल्या पोलिसांनीच जयश्री वेळदा यांना पुन्हा कार्यालयात पोहोचवून दिले. 

जयश्री वेळदा यांनी खर्च सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना खर्च सादर करून फाईल नेण्याबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. निवडणूक विभागाला पोलिस बळाचा वापर करण्याचा कुठलाही अधिकार नाही. 
-अभ्र घोष, निवडणूक निरीक्षक (खर्च विभाग), गडचिरोली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger among activists