महाविकासआघाडीच्या कर्जमाफीवर शेतकऱ्यांमध्ये संताप

Anger among farmers over loan waiver
Anger among farmers over loan waiver

रिसोड (वाशीम) : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ केले. मात्र, या कर्जमाफीत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बॅंकेमध्ये क्रेडीट राहावे यासाठी उसणवारी किंवा व्याजाने पैसे घेऊन कर्ज नवे-जुने करतात. मात्र, हाच प्रामाणिकपणा त्यांच्या मुळावर आला आहे.

कर्ज माफीमध्ये बसण्यासाठी आधार लिंक व आवश्‍यक कागदपत्रांसाठी बॅंकेकडून पाठपुरावा चालू झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे थकित कर्ज माफीची घोषणा केली नियमीत कर्ज भरणाऱ्यांसाठीही लवकर चांगला निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार ता. 31 मार्च 2019 पर्यंत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत थकित कर्ज माफ होणार आहे. मात्र, या कर्जमाफीतून शासनाने नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वगळले आहे. त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी दरवर्षी नियमितपणे कर्ज उचलून त्याची परतफेड करतात. कारण, बॅंकेमध्ये आपली पत रहावी व आपल्याला पुन्हा पुन्हा कर्ज मिळावे. हाच उद्देश त्या मागे राहतो. परंतु, त्यांनाच या कर्जमाफीतून वगळण्यात आल्याने आशा शेतकऱ्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकरी नैसर्गीक संकटांनी त्रस्त

गेल्या काही वर्षांत शेतकरी विविध नैसर्गिक संकटांनी त्रासला आहे. खरीप हंगामात परतीचा अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिके वाया गेली. अवकाळी पावसाचा रब्बीला फायदा झाला. मात्र, गहु, हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

नवीन घोषणा होईल तेव्हा खरी

सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. तर नवे-जुने कर्ज करणाऱ्यांसाठी चांगला निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. फक्त प्रोत्साहणपर 25 टक्‍क्‍यांचा फायदा झाला आहे. थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे लाभ मिळण्यासाठी आता ता. 31 मार्च येण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे नियमीत कर्जभरणाऱ्यांना लाभ मिळेल तेव्हा खरे, अशी प्रतिक्रिया शेतकरी निवृत्ती शहाजी काळदाते यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com