संताप! उपविभागीय कार्यालयावर धडकले शेतकरी

उमरेड : उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी शेतकरी व नागरिक.
उमरेड : उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी शेतकरी व नागरिक.

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड विधानसभा क्षेत्र भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजू मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. 17) उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उमरेड, भिवापूर व कुही तालुक्‍यांतील शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार श्री. हटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पशुखाद्याचे दर दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. काही महिन्यांपूर्वी सरकी व ढेपीचे दर प्रतिकिलो 20 रुपये होते. सध्या ते 40 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. पशुखाद्य विक्रेत्यांकडील 50 किलोचे पोते 47 ते 48 किलो भरत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुधाला मिळणारे भाव जैसे थे असल्यामुळे व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. एकट्या उमरेड शहरात 50च्या जवळपास दूध उत्पादक व गोपालक आहेत. परंतु, पशुखाद्याच्या दर वाढीमुळे सगळे चिंताग्रस्त झाले आहेत.
पूर्वी थोडाफार नफा शिल्लक उरायला. दरवाढीमुळे पशुखाद्य विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले आहे. कर्ज वसुलीसाठी व्यापारी तगादा लावत असल्यामुळे अधिकच अडचण निर्माण झाली आहे. सरकारने वेळीच समस्येकडे लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com